3 गुन्हे उघड, 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

गौतम बचुटे/केज:-
सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील म्हैस चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, बीड ने मोठी कारवाई केली आहे.

दि. 23.08.2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की म्हैस चोरीतील आरोपी म्हातारगावामध्ये आहे. माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने सापळा रचून मुंजा भगवान मोरे, वय 26, रा. कारी, ता. धारूर, जि. बीड यास मोटरसायकल सह ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने केज पोलीस ठाणे हद्दीतील केवड गावातूनही म्हैस चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडील मोटरसायकलची चौकशी केली असता ती परांडा येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीकडून एकूण 3 गुन्हे उघड झाले आहेत –
1) सिरसाळा गु.र.नं. 244/2026
2) केज गु.र.नं. 509/2026
3) परांडा गु.र.नं. 350/2026
कलम 303(2) BNS

आरोपीकडून ₹70,000 चा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, गणेश मराडे यांनी केली.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *