विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घवघवीत विजय संपादन केला. या विजयाबद्दल परळी शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे नेते राजाभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी येथे कार्यकर्ते जमले होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, दीपक देशमुख, जीवनराव देशमुख, रमेश गायकवाड, नगरसेवक कादर कुरेशी, युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोज, अमर रोडे, राज हजारे, सनी कसबे, शारेक शेख जुबेर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...