विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीच्या मंजूर आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या मागासवर्गीय महिलांनी मंगळवारी (दि. 27) मुख्य अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेत हा प्रकार रोखल्याने मोठा अनर्थ टळला. महाजेनकोच्या परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाने मागासवर्गीय महिलांच्या नावावर राख विक्रीसाठी दोन […]
