गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील लव्हुरी येथील श्री बडेबाबा विद्या मंदिरातील शिक्षक भरतीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच पंडित उर्फ मुन्ना चाळक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.नेमका आरोप काय आहे?
सरपंच चाळक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळा प्रशासनाने संच मान्यता मिळवण्यासाठी बाहेरच्या गावातील विद्यार्थी बोगस पद्धतीने दाखवले आणि शिक्षक भरतीत नियम डावलले. यामुळे शासनाची आणि शिक्षण विभागाची फसवणूक झाली आहे.

कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई नाही – सरपंचांचा आरोप
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. ९ जुलै २०२६ रोजी ८ आठवड्यात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी १४ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.ग्रामस्थांनी या संदर्भात २१ जानेवारी, ११ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाला वारंवार निवेदने दिली आहेत, परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे सरपंच चाळक यांनी सांगितले.