विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथील सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री सोमेश्वर कन्या प्रशालेत ‘जागर शक्तीचा’ या विशेष उपक्रमांतर्गत कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनी व महिलांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थाध्यक्ष डॉ. उद्धवराव शिंदे, सचिव अजितदादा देशमुख, उपाध्यक्ष महेशआप्पा शेटे, मुख्याध्यापक आर.पी.मुळे सर यांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली.या सोहळ्यात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. कविता गित्ते, रेल्वे पायलट शिकन्या खजे, सरपंच अनिता मोरे, उच्च न्यायालयाच्या वकील ॲड. सुष्मिता दौंड, इंदुताई पवार, अभियंता रुपाली माने आणि प्राध्यापिका भाग्यश्री दोडे या माजी विद्यार्थिनींनी आपला प्रेरणादायी प्रवास मांडला.प्रमुख वक्त्या प्रा. बरुरे मॅडम (एस.आर.टी. महाविद्यालय, अंबाजोगाई) यांनी विद्यार्थिनींना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एल.देशमुख मॅडम यांनी केले तर आभार पारेकर मॅडम यांनी मानले.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

यावेळी कर्तृत्ववान महिला म्हणून सुचित्राताई देशमुख, डॉ. संगीता कुलकर्णी आणि भाग्यश्री साळुंके यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

व्हिडिओ बातमी

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.