अंबाजोगाई / प्रतिनिधी: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या दुसरा टप्पा शुक्रवारी दि. १६ व शनिवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचे लक्ष वेधनार आहेत तर दुसरीकडे दि. १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवृत्त न्यायालयीन कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध नोंदविणार आहेत.
राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचारी यांनी शासनाविरुध्द लढा उभारला असून हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येवून पोहचला आहे. त्यामुळे शुक्रवारी दि. १६ व दि.१७ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयीन कर्मचा-यांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून आपले दैनंदिन कामकाज करित शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कामजात आज सहभाग आज सर्व कर्मचाऱ्यांनी नोंदविला. दुसरीकडे दि. १७ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व निवृत्त न्यायालयीन कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
सदरील आंदोलनाची दखल न घेतल्यास नियोजित आंदोलन पुढे सुरुच राहणार असून यंदाची दिवाळी साजरी न करता येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी हे सामुहिक रजेवर जाणार असून पुढे दि. १७ नोंव्हेंबर पासुन बेमुदत संप पुकारण्याचा निर्धार केला आहे. सदरील आंदोलनातचा भाग म्हणून आज सर्व अंबाजोगाई न्यायालयीन कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला आहे
