अंबाजोगाई/प्रतिनिधी: नासा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चाचणी परीक्षेत भावठाणा केंद्राने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या केंद्रातून एकूण 15 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात एकट्या जि. प. प्रा. शाळा सोनवळा या शाळेच्या 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सोनवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात अव्वल यश मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या यशाबद्दल केंद्रीय मुख्याध्यापक रामभाऊ पवार, केंद्र प्रमुख जयराम केंद्रे, मुख्याध्यापक चंदर सिनगारे, मार्गदर्शक शिक्षक संतोष कदम, मनोज देशमुख, श्रीधर देशपांडे, दीपक बिडवे, मुंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सोनवळा गावचे सरपंच राधाकिसनजी पतंगे, उपसरपंच सुधाकर इंगळे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
श्रुती अभिजीत पतंगे – 86 गुण (तालुक्यात द्वितीय क्रमांक) स्नेहा सोनेराव पतंगे – 84 गुण (तालुक्यात तृतीय क्रमांक) स्वराज विश्वनाथ ठोंबरे – 72 गुण, शिवानी गणेश रणदिवे – 70 गुण, समर्थ विजयानंद पतंगे – 68 गुण ,ज्ञानेश्वरी दीपक पतंगे – 68 गुण, स्वप्निल रामेश्वर पतंगे – 66 गुण, अंजली सूर्यकांत गिरी – 64 गुण, सार्थक काशिनाथ ठोंबरे – 64 गुण, नमन लक्ष्मण पतंगे – 64 गुण
