अंबाजोगाई: अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळवटी धरण तलावातील पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिला असून, पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अर्ध्या अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्यावर आणि परिसरातील शेतीवर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात […]
