डॉ. सलीम अली जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह उत्साहात
ङि सदानंद/अंबाजोगाई: भारताचे थोर पक्षीशास्त्रज्ञ बर्डमॅन ऑफ इंडिया डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्त. अंबाजोगाई येथील मुकुंदराज व्हॅली परिसरातील बोटॅनिकल गार्डनमध्ये भव्य पक्षी निरीक्षण उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ठीक ६.३० ते ८.३० या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत निसर्गप्रेमींनी पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे निरीक्षण केले.
पक्षी सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करणे. पक्षी हे पर्यावरणाच्या आरोग्याचे निर्देशक मानले जातात. ज्या परिसरात पक्षी विविधता जास्त असते, तो परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अधिक समृद्ध मानला जातो. डॉ. सलीम अली यांनी पक्षीशास्त्रात दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच आज भारतात पक्षी संवर्धनाला चालना मिळाली आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती ओढ निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची नोंद
यावेळी उपस्थितांचे आठ वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रत्येक गटाने व्हॅली परिसरातील विविध ठिकाणी जाऊन पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि खाद्य शोधण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. यावेळी स्थानिक व स्थलांतरित अशा ३० ते ४० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.हा उपक्रम केवळ निरीक्षणापुरता मर्यादित न राहता, निसर्गाचा आनंद घेत त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, हा महत्त्वपूर्ण संदेश यातून देण्यात आला.

उपक्रमास उपस्थित मान्यवर
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अंबाजोगाई: एस.जी. वरवडे (वनपरिक्षेत्र अधिकारी), पी.ए. खरात (वनपाल), एस.व्ही. पाखरे (वनपाल), एस.एम. टाकणखार (वनपाल), बी.पी. पवार (वनपाल).
परळी प्रादेशिक परिक्षेत्र: भगवान गीते (वनपरिक्षेत्र अधिकारी), विजया शिंगटे (वनपाल), अशोक बिलपे (वनरक्षक), अंकुश जाधव (वनरक्षक), पांडुरंग मुंडे (वनरक्षक), प्रियंका तागड (वनरक्षक).
YESS अंबाजोगाई व निसर्गप्रेमी मंडळी: शुभदा लोहिया, अभिजित लोहिया, मुन्ना सोमाणी, मुंडे सर, रत्नाकर निकम, सदानंद वालेकर, प्रदीप तरकसे, धानोरकर सर, प्रतीक्षा निकम, निकम वहिनी, हेमंत धानोरकर, अविनाश मुंडे, निरज गौड, अर्जून थोरात, श्रीधर देशपांडे तसेच योगेश्वरी महाविद्यालयातील विद्यार्थी.

