विश्वजीत गंडले/परळी: परळी शहरातील समतानगर भागात बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सायस रामराव मुंडे (वय ४५, व्यवसाय – वकील, रा. समतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्याच्या म्हणजेच व्यंकटराव नारायणराव फड यांच्या घरात […]
