विश्वजीत गंडले/परळी: परळी शहरातील समतानगर भागात बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सायस रामराव मुंडे (वय ४५, व्यवसाय – वकील, रा. समतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्याच्या म्हणजेच व्यंकटराव नारायणराव फड यांच्या घरात ही चोरी झाली. दि. १६ ऑक्टोबर रात्री ९ ते १७ ऑक्टोबर सकाळी ६:३० दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२६ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सपोनि गट्टूवार करत आहेत.
चोरीस गेलेला मुद्देमाल
रोख रक्कम – २,०२,००० रुपये (५०० च्या ४०४ नोटा), सोन्याचे मिनी गंठण १५ ग्रॅम – ४५,००० रु., सोन्याचे पट्टी गंठण ३० ग्रॅम – ९०,००० रु., सोन्याचे झुंबर व सरपाळ १५ ग्रॅम – ४५,००० रु., सोन्याची अंगठी १० ग्रॅम – ३०,००० रु.,चांदीचे ताट ७०० ग्रॅम – ५०,००० रु., चांदीचे करंडा, जोडवे, वाट्या, फुलपात्र – १५,००० रु. असा ४ लाख ७७ हजारांचा ऐवज चोरी
