माजलगाव दि. १८: माजलगाव-तेलगाव रोडवरील हॉटेल शिवराज जवळ आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पाथरूड (तेलगाव-माजलगाव मार्ग) येथे एसटी बस क्रमांक MH-२०-२७४० आणि हुंडाई कार क्रमांक […]
