केज / प्रतिनिधी : केज-अंबाजोगाई रोडवरील होळ शिवार परिसरात असलेल्या आडस फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात दुचाकीवरील शेखर भगवत पाटोळे (वय २२, रा. बोरीसावरगाव, ता. केज) व त्यांचा चुलत भाऊ राजवीर भारत पाटोळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बोरीसावरगाव येथील शेखर पाटोळे व राजवीर पाटोळे हे MH44 AA 6124 क्रमांकाच्या दुचाकीवरून केजकडून अंबाजोगाईच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या MH04 05476 क्रमांकाच्या कारने भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या धडकेमध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शेखर भगवत पाटोळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *