अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे शेतातील रस्ता आणि तहसील कार्यालयातील अर्जाच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा:

रस्त्याच्या वादावरून घरात घुसून चाकू हल्लाफिर्यादी निशांत साहेबराव गाडवे (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता शेतातून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ केली. विरोध केला असता आरोपीने खिशातील चाकूने हल्ला केला, यात निशांत यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.भांडण सोडवण्यासाठी आलेले आई-वडील, चुलते-चुलती आणि चुलत भावालाही काठीने आणि चापटबुक्यांनी मारहाण करण्यात आली. “पुन्हा शेतातून गेलात तर जिवाने मारून नदीत पुरून टाकू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी यशपाल गाडवे, तुषार गाडवे, नायबराव गाडवे, संतोष हारे, पंचफुला गाडवे, स्वाती गाडवे आणि मनिषा गाडवे (सर्व रा. जवळगाव) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २८३/२०२६ दाखल झाला आहे.

दुसरा गुन्हा:

तहसीलच्या अर्जावरून मारहाणदुसऱ्या फिर्यादीत नायबराव नारायण गाडवे (वय ५५) यांनी तक्रार दिली आहे की, शेताच्या नदीपात्राबाबत तहसील कार्यालयात दिलेल्या अर्जाचा राग धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून काठीने मारहाण केली.”अर्ज मागे घेतला नाही तर जिवाने मारून टाकू” अशी धमकी देण्यात आली. यात फिर्यादी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना मारहाण झाली आहे.याप्रकरणी साहेब गाडवे, विजयकुमार गाडवे, बाबासाहेब गाडवे, निशांत गाडवे, प्रणीत गाडवे, शैलेश गाडवे, सुकेशना गाडवे, अरुणा गाडवे, मिरा गाडवे, मोहन हारे आणि बाळासाहेब हारे (सर्व रा. जवळगाव) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २८२/२०२६ दाखल आहे.बर्दापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार भाजीभाकरे अधिक तपास करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...