अंबाजोगाई/ प्रतिनिधी: अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातेफळ रोडवर आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या एजंटास दुचाकी अडवून मारहाण करत लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. 30) घडली आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद अरफात मोहियोद्दीन (वय ३९, रा. सायगांव) हे आरटीओ ऑफिस येथे एजंट म्हणून काम करतात. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते दुचाकीवरून गावी जात असताना सातेफळ रोडवरील वीटभट्टीजवळील मशिदीसमोर तीन अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी बळजबरीने थांबवली.आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून त्यांच्या खिशातील १९ हजार ४०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत पलायन केले.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी जाधव करत आहेत.रस्त्यातच आरटीओ एजंटास लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...