गौतम बचुटे/केज :- प्लॉट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून २९ वर्षीय विवाहितेचा सतत छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना माजलगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहर माहेर असलेल्या मुमताज फेरोज शेख (वय २९) या विवाहितेस तिचा पती फेरोज सिकंदर शेख याने “प्लॉट घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये,” असा तगादा लावला. पैसे आणत नाहीस म्हणून तिला सतत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.पती फेरोज सिकंदर शेख, सासू बानू सिकंदर शेख आणि नणंद परविन सिकंदर शेख (सर्व रा. माजलगाव) यांनी संगनमत करून “प्लॉटसाठी दोन लाख रुपये आण, अन्यथा घरात राहायचे नाही,” असे म्हणत शिवीगाळ, चापटाबुक्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच उपाशीपोटी ठेवून घरातून हाकलून दिले.

ही घटना १७ फेब्रुवारी ते २० मे या कालावधीत घडली असून, पीडित मुमताज शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती फेरोज शेख, सासू बानू शेख आणि नणंद परविन शेख या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार निर्मला जाधव करीत आहेत.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...