अंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील गिरवली शिवारात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसात आठ जणा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार अतुल जोगदंड (३६, गिरवली बावणे) हे मूळचे शेतकरी असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वी गिरवली येथील गट नंबर २ मधील शेतजमीन कायदेशीररित्या खरेदी केली होती. मात्र त्याच शिवारात शेती करणाऱ्या आपेट व जगदाळे कुटुंबीयांचा या खरेदीला सुरुवातीपासूनच विरोध होता. ते वारंवार जोगदंड यांना शेतात जाऊ देत नव्हते. २ नोव्हेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास जोगदंड आपल्या शेतात कामानिमित्त गेले असता दबा धरून बसलेल्या आठही आरोपींनी त्यांना घेरले. यावेळी त्यांना अश्लील व जातीवाचक भाषेत शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

यातील एक आरोपी महादेव विठ्ठल आपेट याने हातातील काचेची बाटली थेट डोक्यात फोडल्याने जोगदंड गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेनंतर बर्दापूर पोलिसांनी अतुल जोगदंड यांच्या फिर्यादीवरून गंगाधर आपेट, अशोक आपेट, महादेव आपेट, उत्तरेश्वर आपेट, परमेश्वर आपेट, अक्षय आपेट, अर्चना आपेट आणि वैजंता जगदाळे (सर्व रा. गिरवली आपेट) या आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सर्वांवर ॲट्रॉसिटी कायद्यासह बीएनएसच्या संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास DYSP ऋषिकेश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...