गौतम बचुटे/केज: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते गजानन काळे यांनी केज तालुक्यातील एक हजार कुटुंबियांना दीपावली निमित्त महाराष्ट्र धर्माचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शिधा वाटपाची सुरुवात केज तालुक्यातील माळेवाडी येथून करण्यात आली. माळेवाडी गावातील प्रत्येक घरातील नागरिकांना दि. ४ नोव्हेंबर बुधवारी शिधा वाटप करण्यात आला. तर दि. ५ नोव्हेंबर रोजी धोत्रा येथे मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या उपस्थितीत शिधा वाटप होणार आहे.पहिल्या टप्प्यात धोत्रा व माळेवाडी येथील ५०० कुटुंबाला तर दुसऱ्या टप्प्यात ५०० ऊसतोड मजूर कुटुंबाला शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिली आहे.या कार्यक्रमाला केज तालुका अध्यक्ष अतुल कुलकर्णी, महादेव घुले, गोविंद हाके, सरपंच सुदाम हाके यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
