गौतम बचुटे/केज – केज-मांजरसुंबा रस्त्यावर चित्रपटाला शोभेल असा थरार घडला आहे. चालत्या ट्रकवर चढून चोरट्यांनी ७१ हजार ५०० रुपयांचा चहा लंपास केला आहे.
जालना जिल्ह्यातील देवगाव कुसळी येथील ट्रक चालक मुसा बाबा शेख हे ट्रक क्रमांक एमएच-१५/डी के-२७३४ मध्ये चहा पत्तीच्या बॅग भरून लातूरकडे निघाले होते. दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५:४५ वाजता अंबळाचे बरड फाट्यापुढे सारुळ फाटा ते सांगवी फाटा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून प्रत्येकी २० किलो वजनाच्या ११ बॅग चोरून नेल्या.
या प्रकरणी ट्रक चालक मुसा शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु र नं ६९८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर तपास करीत आहेत.
