अंबाजोगाई : येथील संत गाडगेबाब सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीच्या उपक्रमातर्फे शनिवारी (दि.७) बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या हस्ते बीडसह इतर जिल्ह्यातील ११०० गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व माहेरची साडी भेट देण्यात येणार आहे.


सकाळी ११ वाजता बीड रोडवरील विवान्स सायली मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे राहाणार आहेत. संभाजीनगर येथील राज्य प्रदुषण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सिंधु कापरे, शोभा बाबु खडकभावी, प्रा. रोहिणी पाठक, लातूर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.निहारीका नागरगोजे, आदर्श शिक्षक शितल बोधले, अर्चना सुनिल सोळंके, रजनी प्रवीण देशमुख, रुपाली काकडे, मोनिका मुंदडा, स्वाती चेतन मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.

आधार माणुसकी सोबतच पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ, ठाणे येथील विद्यार्थी विकास योजना, ज्ञानेश्वर मुळे यांची चांगुलपणा चळवळ व लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे. बीडसह लातूर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, वडिलांचे छत्र हरवलेले कुटुंब, कोवीड व कॅन्सरग्रस्त कुटुंब यासह गरीब व गरजू ११०० कुटुंबांना हा फराळ वाटप करुन वंचितांची दिवाळी गोड केली जाणार आहे. याबरोबरच १००० महिलांना दिवाळीनिमीत्त भाऊबीज भेट म्हणून माहेरची साडी दिली जाणार आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, रामकृष्ण पवार, चंद्रशेखर शिंदे, रवींद्र लोमटे, बळीराम जोगदंड, अनंत निकते, बंडू जांभळे, धनराज पवार, संजय सुरवसे, माऊली नांदवटे, राहुल शिंदे व आधार माणुसकीच्या परिवाराने केले आहे.

फराळाची तयारी पूर्ण

या कुटुंबांना रुचकर व चांगला फराळ देण्यासाठी मागील आठ दिवसापासून तयारी सुरू होती. ती पूर्ण झालेली असून प्रत्येक कुटुंबांना अडीच किलोचा फराळ व माहेरची साडी देण्यात येणार आहे.


Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...