डी. सदानंद/अंबाजोगाई: – शहरातील तथागत चौक येथे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विजेच्या डीपीला भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत अवघ्या दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने वेळेत केलेल्या कारवाईमुळे आग आटोक्यात आली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे.मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...