अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दिवाळीतील लक्ष्मीपूजन सणाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात आज सकाळपासूनच झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगाची ताजी फुले रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत.

दिवाळीत दाराला तोरण बांधण्यासाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुले घेऊन येतात. यंदाही चौकालगतच्या मोकळ्या जागेत विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत.मात्र यंदा चित्र वेगळे आहे.

दुष्काळाचा परीणाम

जिल्ह्यावर असलेल्या दुष्काळाच्या सावटाचा आणि महागाईचा थेट परिणाम फुलांच्या बाजारावर दिसत आहे. दरवर्षी दिसणारी तुफान गर्दी यंदा कमी असून, नागरिक गरजेपुरतीच खरेदी करताना दिसत आहेत. दुष्काळामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आल्याने सणाचा उत्साह काहीसा मंदावल्याचे चित्र आहे.

फुल विक्रेत्यांची व्यथा

“अत्यंत कष्टाने जगवलेली ही फुले ग्राहक कमी भावाने मागत आहेत” –विजय शेंडगे, फुल विक्रेते, अंबाजोगाई

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...