अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा -: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने भक्तिप्रेम आश्रमात दिवाळी फराळ वाटप करून उपेक्षितांसोबत दिवाळीचा आनंद घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा होते. तर मंचावर रोटरीचे अध्यक्ष शेख शकील बागवान, सचिव राधेश्याम लोहिया, प्रकल्प संचालक धनराज सोळंकी, अविनाश मुडेगांवकर,भक्तिप्रेम आश्रमाचे संचालक पवन गिरवलकर, प्रसिद्ध गायक आसाराम जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले की गेल्या ११ वर्षांपासून रोटरी क्लब हा उपक्रम सातत्याने राबवित आहे. समाजातील उपेक्षित,निराधार यांच्या सोबत दिवाळी साजरी करून खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद घेत आहेत. दिवाळीचा खरा आनंद हा इतरांसोबत साजरी करण्यातच असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रसिद्ध गायक आसाराम जोशी यांनी आश्रमातील ज्येष्ठांसाठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. अध्यक्षीय समारोपात शेख शकील यांनी वंचित घटकांसाठी रोटरीचे काम सुरू असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. यावेळी पवन गिरवलकर यांनी आश्रमाची माहिती उपस्थितांना सांगून लोकाश्रयावरच आश्रमाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र घोडके,गोरख मुंडे, प्रा.रोहिणी पाठक,प्रा.अजय पाठक, प्रवीण चोकडा, डॉ.अनिल केंद्रे, बालाजी घाडगे, भागेश तापडिया,कल्याण काळे,बाळासाहेब कदम, गोपाळ पारीख, यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...