अंबाजोगाई (बीएन वृत्तसेवा) – अंबाजोगाई शहरातील वरवटी भागात कौटुंबिक वादातून एका महिलेला आणि तिच्या लहान मुलाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

फिर्यादी कविता प्रल्हाद ढाकणे (रा. वरवटी, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रुक्मिणीबाई बाबुराव ढाकणे, दिपाली कैलास ढाकणे आणि कैलास बाबुराव ढाकणे (सर्व रा. वरवटी) यांनी संगनमत करून त्यांना केस धरून खाली पाडून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.आईला सोडवण्यासाठी आलेल्या लहान मुलालाही किटलीने मारहाण करून जखमी केले आणि “तुला आणि तुझ्या मुलाला जिवंत सोडत नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...