आडस: केज तालुक्यातील आडस येथे लोकनेते स्व. बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या विचारधारेचा वारसा जपत दरवर्षी प्रमाणे यंदाही दीपावली पाडवा निमंत्रण व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “वारसा परंपरेचा, पाडवा परंपरेचा..!” या संकल्पनेतून आडसकर परिवाराच्या वतीने या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. बाबुरावजी आडसकर साहेब यांनी घालून दिलेल्या सामाजिक, राजकीय आणि विकासाच्या परंपरेनुसार आडसकर परिवाराकडून दरवर्षी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि ग्रामस्थ यांची स्नेहभेट घेतली जाते. यंदाही या परंपरेचे पालन करत हा कार्यक्रम होत आहे. या शुभ प्रसंगी केज विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आडसकर परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपावली पाडव्याच्या शुभेच्छांचा स्वीकार करावा, असे आवाहन आडसकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक व स्थळ

हा दीपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, आडस, ता. केज, जि. बीड येथे संपन्न होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...