महाश्रमदानातून गाव चकाचक, घंटागाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न
शिवाजी जाचक/ममदापूर (पा.): जिल्हा परिषदेच्या ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या महाश्रमदान अभियानाला अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावकऱ्यांनी एकत्र येत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवली.
या मोहिमेत ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक, शाळकरी विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावातील मुख्य चौक, जिल्हा परिषद शाळेचा परिसर आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’चा संदेश यावेळी देण्यात आला.
स्वच्छता मोहिमेनंतर गावातील प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच पंचरावा वित्त आयोगाच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन घंटागाडीचा लोकार्पण सोहळा सरपंच सौ. महादेवी बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच बालाजी देशमुख, ग्रा.पं. सदस्य कुलदीप देशमुख, आकाश वाघमारे, उत्तरेश्वर देशमुख, आशाताई वाघमारे, अंगणवाडी कर्मचारी, जि.प. शाळेच्या शिक्षिका प्रत्येकीचे मॅडम, सीआरपी, तसेच हरिश्चंद्र वाघमारे, प्रकाश वाघमारे, किसन गवळी, प्रिती किचमे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हजार वृक्ष देण्याचे आश्वासन
वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी उपस्थितांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले व नांदडी गावासाठी 1000 वृक्षांची रोपे देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत अधिकारी सुनील मामाडगे व आबासाहेब देशमुख यांनी केले होते.
