अंबाजोगाई/ बीएन प्रतिनिधी: अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव येथील HP पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला आहे.
28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता MH 01 FD 4933 क्रमांकाच्या कार चालकाने इंडिकेटर न देता, अचानक ब्रेक मारून गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली. त्यामुळे पाठीमागून येणारी मोटरसायकल जोरात कारवर धडकली. या अपघातात परभणीचा 19 वर्षीय तरुण शेख अबुबकर सिद्दिक गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.ना. घोळवे करत आहेत.
अशाच बीडच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनल Follow करा आणि 🔔 घंटी All करा!
