गौतम बचुटे/ केज :-
माजी सैनिकांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मद्य खरेदीचे मिलिटरी कॅन्टीनचे लिकर कार्ड दे, म्हणून हातात कोयता घेऊन आलेल्या इसमाने देशसेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाला दगड आणि विटांनी मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

केज तालुक्यातील होळ येथील श्रीमंत दशरथ शिंदे (वय 61 वर्षे) हे माजी सैनिक आहेत. दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता, नेताजी व्यंकटराव लोमटे हा दारू पिऊन हातात कोयता घेऊन तेथे आला. त्याने दशरथ शिंदे यांना “तुमचे मिलिटरी कॅन्टीनचे लिकर कार्ड मला पाहिजे” असे म्हटले. ते कार्ड आपण वापरत नाही असे सांगताच, “कार्ड द्यायचे नसेल तर देऊ नको, पण तू दारू पी” असे म्हणून त्याने त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि पाठीत व डोक्यात दगड आणि विटांनी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी श्रीमंत दशरथ शिंदे यांच्या तक्रारीवरून नेताजी लोमटे याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या साठी बीड न्यूज एक्सप्रेस फॉलो करा.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...