अंबाजोगाई /बीएन प्रतिनिधी:
आंबा साखर कारखाना ते ममदापूर रोडवर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या दोन अपघातग्रस्त दुचाकींची मागची चाके अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. २ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी दोन्ही गाड्यांचा भीषण अपघात झाला होता.

🔴 अंबाजोगाई ब्रेकिंग
अपघातग्रस्त गाडीची चाके चोरीला!

▶️ व्हिडिओ पहा

सविस्तर बातमी अशी की, आंबा साखर कारखाना ते ममदापूर रोड या रस्त्यावर कारखान्याच्या एकदम समोरील रस्त्यावर स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक: MH 44 H 8574) आणि पॅशन प्रो दुचाकी (क्रमांक: MH 13 AW 3230) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला व चालक जखमी झाले होते. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, अपघातग्रस्त वाहने कारखान्याच्या एकदम समोरील रस्त्यावर तशीच पडून राहिल्याचा फायदा घेत भामट्याने दोन्ही दुचाकींची मागची चाके काढून नेली. अपघातग्रस्त वाहनांचीही चोरी होत असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, अशा चोरट्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...