अंबाजोगाई / बीएन प्रतिनिधी : जुन्या व्यवहाराच्या कारणावरून कुरापत काढून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावठाणा येथील रहिवासी अनंत बाबूराव कापसे (वय ३६, व्यवसाय शेती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गावातील आरोपी दिनेश मारुती वाघमारे आणि मारोती दत्तू वाघमारे ( दोघे रा. भावठाणा) यांनी संगनमत करून लोखंडी गज आणि दगडाने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस अंमलदार मुंडे करीत आहेत.

