गौतम बचुटे/केज: २०१५-१६ च्या भीषण दुष्काळात बीड येथील ‘गौतम खटोड प्रतिष्ठान’च्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आले होते. त्याच वेळी औरंगाबादच्या   (छत्रपती संभाजीनगर )’सिमेन्स कंपनी’तील गणेश मंडळाने उत्सवातील अनावश्यक खर्च टाळून ५३ हजार ५०० रुपयांचा निधी जमा केला होता. हा निधी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची इच्छा माझा लहान भाऊ सतीश बचुटे याने व्यक्त केली. मी पत्रकार असल्याने नानांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर सोपवली.

त्या वेळी मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता करत होतो, ते ज्येष्ठ पत्रकार अविनाश वाघीरकर हे खटोड प्रतिष्ठानशी निगडित असल्याने मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही भेट घडवून देण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे ६ जानेवारी २०१६ रोजी मी बीडला गेलो. तेथे सतीश बचुटे आणि त्यांचे सहकारी उमेश पवार, अनिल सोनवणे, धोंडू सोनवणे, प्रकाश जाधव आले होते. जालना रोडवरील हॉटेल मिलन येथे नाना पाटेकर थांबले होते. तिथे मोठी गर्दी असतानाही वाघीरकर सरांच्या मदतीने आमची भेट झाली आणि ५३ हजार ५०० रुपयांचा धनादेश नानांच्या सुपूर्द करण्यात आला. नानांनी या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

त्या वेळी एका तरुण महिला डॉक्टरशी बोलताना शेतकरी आत्महत्यांवर नाना भावूक होऊन म्हणाले—

  “टीका करणारे जरी शेतकऱ्यावर व्यसनाचे आरोप करत असले, तरी शेतकरी नापिकी, कर्जाचे ओझे आणि मुलीचे लग्न या विवंचनांमुळे आत्महत्या करतो. हे दुःखाचे चक्र थांबवण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.”

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...