गौतम बचुटे/केज:- केज-कळंब मार्गावर एसटी महामंडळाची पर्यावरण पूरक वातानुकूलित ई-बस सेवा सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र याच ई-बसमध्ये विद्यार्थ्यांचा सवलतीचा पास ग्राह्य धरला जात नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.१७) सकाळी ई-बस अडवून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

साळेगाव, माळेगाव, मांगवडगाव, शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, हदगाव, डोका, सारूकवाडी, चिंचोली माळी या परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी केज आणि कळंब येथे ये-जा करतात. या मार्गावर ई-बस सुरू झाल्यापासून साध्या लाल बस बंद करण्यात आल्या आहेत. ई-बसमध्ये विद्यार्थी पास चालत नसल्याने रोजचे पूर्ण तिकीट घ्यावे लागत आहे. आर्थिक भार परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.ई-बसमध्ये विद्यार्थी पासची सवलत तात्काळ सुरू करावी, अन्यथा या मार्गावर साधी बस सेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी यावेळी केली आहे.

पूर्वी दिलेले निवेदन

दि. १५ ऑक्टोबर रोजी सरपंच कैलास जाधव पाटील, पत्रकार गौतम बचुटे, सुधाकर इंगळे यांनी आगार प्रमुख घोलप यांना निवेदन दिले होत.

ताज्या बातम्यांसाठी वाचत रहा बीड न्युज एक्सप्रेस..

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...