अंबाजोगाई: दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जातात. याच काळात बंद घरांना चोरटे लक्ष करण्याची शक्यता असते. त्यामुळे बीड जिल्हा पोलिसांच्या अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी 9 महत्त्वाच्या सूचना
🔒 मुख्य दरवाजे, खिडक्यांना मजबूत कुलूप लावा
📹 CCTV, व्हिडिओ डोअर बेल सुरू ठेवा
💎 सोने, रोख रक्कम घरात ठेवू नका, बँक लॉकर वापरा
💡 बाहेरील लाईटसाठी ऑटोमॅटिक टायमर वापरा
👥 बाहेरगावी जात असल्याची माहिती विश्वासू शेजाऱ्यांना द्या
📰 पेपर, दुधाची योग्य व्यवस्था करा
📵 बाहेरगावी जात असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकू नका
🔑 चाव्या शू-रॅक, कुंडीत लपवू नका
📝 पोलीस स्टेशनला तुमची माहिती नोंदवा (ऐच्छिक)
पोलिसांची विशेष गस्त सुरू!
दिवाळीत विशेष गस्त, पेट्रोलिंग आणि संशयितांवर लक्ष ठेवले जाणार आहे.संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ 112 वर कॉल करा!”सतर्क राहा, सुरक्षित राहा!”आपली सुरक्षा, आमची जबाबदारी!
