धारुर (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील व धारुर तालुक्यातील आडस या गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आडस येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. […]
