गौतम बचुटे/केज: बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केज तालुक्यातील कानडी बदन येथे जय किसान आत्मा शेतकरी गटातील शेतकऱ्यांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे किट वितरित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून भोजन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खरीप हंगामातील पीक उत्पादन, दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणींवर चर्चा […]
