विश्वजीत गंडले/घाटनांदुर: वडील ऑटो रिक्षा चालवत असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असतानाही, कोणतेही खाजगी ट्युशन किंवा कोचिंग क्लास न लावता केवळ कॉलेजच्या शिकवणीवर अभ्यास करत मूळची अंबाजोगाई तालुक्यातील चोपनवाडी येथील स्नेहा रमाकांत बडे हिने मोठे यश संपादन केले आहे. तिचा कागल, जि. कोल्हापूर येथे BAMS अभ्यासक्रमासाठी नंबर लागला आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा, चोपनवाडी, दहावीपर्यंतचे शिक्षण शंकर विद्यालय, घाटनांदूर, तर अकरावी-बारावी जीजामाता उच्च माध्यमिक विद्यालय, धर्मापुरी, ता. परळी येथे झाले. स्नेहा ने मिळवीलेल्या यशबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
भावाचीही वैद्यकीय क्षेत्रात भरारी
स्नेहाचा मोठा भाऊ सध्या धाराशिव येथे MBBS च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. वडील ऑटो रिक्षा चालक असूनही दोन्ही मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकल्याने त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
