अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- रुग्णालयात असतानाही रुग्णाला दीपावलीची उणीव भासू नये म्हणून फराळ उपलब्ध करून देणे, हे समाजाभिमुख आणि माणुसकीचे दर्शन घडवणारे कार्य राजकिशोर मोदी मित्र मंडळ तथा प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळ करत असल्याचे गौरवोद्गार स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी काढले.

अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त स्वा.रा.ती. रुग्णालयातील रुग्णांना फराळ वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.स्वा.रा.ती. येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. मागील ३७ वर्षांपासून प्रियदर्शनी क्रीडा मंडळ हे रुग्णसेवेची सामाजिक परंपरा अविरतपणे जोपासत आहे.

३७ वर्षांची परंपरा

१९८९ साली मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी आपण दिवाळी सणापासून दूर आहोत, अशी भावना रुग्ण व नातेवाईकांच्या मनात येऊ नये, त्यांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात रुग्णांना दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रकृतीची आस्थेने चौकशी करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून जात होते.

उपस्थित मान्यवर

यावेळी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. विवेक सरवदे, मंडळाचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, गटनेते सय्यद ताहेर, नगरसेवक बबन लोमटे, राजपाल जावळे, अमोल लोमटे, आकाश कराड, जावेद इस्माईल गवळी, अकबर पठाण, अॅड. विकास काकडे, चंद्रकांत गायकवाड, सुनील वाघाळकर, अशोक देवकर, विशाल जाजू, माणिक वडवणकर, गणेश मसने, कचरू सारडा, रुपेश चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, प्रियदर्शनी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...