अंबाजोगाई/ प्रतिनिधी:अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेसमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मांडवा रोडवरील डॉ. धर्मपात्रे यांच्या दवाखान्यासमोर असून, येथील सुमारे २०० मीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावरून रोज शाळेच्या १७०० विद्यार्थिनी, ७० कर्मचारी […]
