अंबाजोगाई/प्रतिनिधी:
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, कुंबेफळ वाघाळवाडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातून सोलरची मोटार व वायर असा सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेपासून ते दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०५:०० वाजेच्या दरम्यान कुंबेफळ वाघाळवाडी शिवार, शेत गट नंबर २६६ येथे घडली. फिर्यादी अण्णासाहेब चंद्रकांत इंगोले (वय ४७, व्यवसाय- शेती, रा. कुंबेफळ, ता. अंबाजोगाई) यांनी विहिरीच्या काठावर काढून ठेवलेले साहित्य चोरट्यांनी लांबवले आहे.

चोरीस गेलेला मुद्देमाल –

१) ३ एच.पी.ची हिमालया कंपनीची जुनी वापरती सोलर पांढुडी मोटार – किंमत अंदाजे १४,००० रुपये
२) काळ्या रंगाची सुमारे १०० फूट लांब, २.५ एम.एम. जाडीची वायर – किंमत अंदाजे ३,००० रुपये असा एकूण १७,००० ते २१,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेला आहे.

गुन्हा दाखल –

फिर्यादी अण्णासाहेब इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं ३१०/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

शेतात रात्रीच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समोर येत असून, ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ही महत्त्वाची बातमी ही वाचा..

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...