गौतम बचुटे/केज: केज-धारूर रोडवर साने गुरुजी निवासी विद्यालयाजवळ एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.
दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धारूरकडून केजकडे येणारी कार क्र. MH-25/BF-1852 ही भरधाव वेगात होती. साने गुरुजी ऊसतोड मजुरांच्या निवासी शाळेजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट शेतातील खड्ड्यात जाऊन उलटली.
दोघे जखमी
या अपघातात संतोष खंडागळे (वय ३२) आणि महादेव शिंदे (वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
