अंबाजोगाई (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अंबाजोगाई आगाराच्या ताफ्यात नव्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून यामुळे या भागातील प्रवासी वाहतुकीला मोठी बळकटी मिळणार आहे. रविवारी ( दि. ०१) आगार परिसरात या सर्व नवीन बसेसचा पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या नवीन गाड्यांचे पूजन अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि अंबाजोगाई आगारप्रमुख शिवराज कराड यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्या मार्गावर धावणार या बसेस

आगारास प्राप्त झालेल्या या ५ नवीन बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी खालील प्रमुख मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.

  • माजलगाव – लातूर: ०२ बसेस
  • अंबाजोगाई – लातूर: ०२ बसेस
  • अंबाजोगाई – मुरुड: ०१ बस

अद्ययावत सुविधा आणि सुरक्षेवर भर

  • ५६ आसनक्षमता: प्रत्येक बसमध्ये ५६ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे.
  • CCTV कॅमेरे: प्रवाशांच्या, विशेषतः महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी गाड्यांमध्ये अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

शासनाच्या धोरणानुसार या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आल्या आहेत.

प्रवासी सेवेत निरंतर वाढ

यापूर्वी माहे जुलै २०२६ मध्ये देखील अंबाजोगाई आगारास ५ नवीन बसेस प्राप्त झाल्या होत्या, ज्या सध्या अंबाजोगाई – अहमदपूर या मार्गावर यशस्वीरीत्या धावत आहेत. आता पुन्हा ५ नव्या बसेसची भर पडल्याने अंबाजोगाई व आसपासच्या परिसरातील प्रवाशांना वेळेवर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...