अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरातील बन्सीलाल नगर भागात दुकानासमोर ठेवलेले २० हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम कटर मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मात्र फिर्यादीच्या सतर्कतेमुळे दोन्ही आरोपी ऑटोरिक्षासह पकडले गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान घडली. फिर्यादी कुशल अशोक आंबाड (वय ३२, रा. आंबाड ट्रेडर्स, बन्सीलाल नगर) यांनी दुकानासमोर DEWALT कंपनीचे कटर मशीन ठेवले होते.आरोपी हरीभाऊ शामराव देवकर आणि अरुण महादेव सरवदे (दोघे रा. गांधीनगर, अंबाजोगाई) यांनी सदर मशीन उचलून ऑटोरिक्षा क्रमांक MH 22 U 3407 मध्ये टाकले.
आवाज आल्याने फिर्यादीने आरडाओरड केली असता, दोघे रिक्षातून पसार होण्याच्या प्रयत्नात होते, मात्र त्यांना पकडण्यात आले.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०३/२०२६, BNS कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुंडे करीत आहेत.
