विश्वजीत गंडले/घाटनांदुर: तळणी येथील रहिवासी शामसुंदर मोहन गित्ते (वय ३६) यांचा ३१ ऑक्टोबर रोजी घाटनांदुर-अहमदपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता, याबाबत बीड न्यूज एक्सप्रेस ने यापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकरणी आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:२० वाजता शामसुंदर गित्ते हे दुचाकीवरून (MH 44 L 5841) तळणीकडे जात असताना घाटनांदुर येथील लक्ष्मीश्वर मंदिरासमोर समोरून आलेल्या भरधाव पिकअपने (MH 44 U 4827) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ते जागीच गतप्राण झाले होते. अपघातानंतर चालकाने मदत न करता पळ काढला होता.याप्रकरणी मयताचे भाऊ दयानंद गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३ नोव्हेंबर रोजी BNS कलम १०६, २८१ आणि मोटार वाहन कायदा १३४(अ)(बी)/१७७ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ३९८/२०२६) नोंद करण्यात आला आहे.

नंबर प्लेट ठरली पुरावा

पिकअप चालक पळून जात असताना त्याच्या वाहनाची नंबर प्लेट MH 44 U 4827 ही घटनास्थळीच तुटून पडली होती. पोलिसांनी पंचनाम्यात ती जप्त केली असून त्याच आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. पुढील तपास सफौ डोंगरे करत आहेत.

अपघाताची बातमी वाचा..

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...