अंबाजोगाई (प्रतिनिधी): लोखंडी सावरगाव येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून एका खाजगी चालकाला वीटाने मारहाण करून तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक मुंजाभाऊ कटारे (वय २७, व्यवसाय- खाजगी ड्रायव्हर, रा. दिंद्रूड, ता. माजलगाव) हे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता लोखंडी सावरगाव येथे बहिनीच्या घरासमोर असताना ही घटना घडली.आरोपी १) संतोष दत्तात्रेय जगताप आणि २) दिपाली संतोष जगताप (दोघे रा. लोखंडी सावरगाव) यांनी संगनमत करून फिर्यादीला “तू आमच्या गावाला का आलास?” असे म्हणत कुरापत काढली. त्यानंतर संतोष जगताप याने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारून दुखापत केली. तसेच दोघांनी शिवीगाळ करून “तू परत या गावाला आलास तर तुला तलवारीने जिवे मारून टाकतो” अशी धमकी दिली.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९९/२०२६, कलम ११५(१), ३५२, ३५१(३), ३(५) BNS अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार घोळवे करीत आहेत.
