गौतम बचुटे/केज :- केज शहरातील मंगळवार पेठेतील कुरिअर व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ६) उघडकीस आली.

आनंद गोपालदास काकाणी (वय ३७, रा. मंगळवार पेठ, केज) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच जमादार कविता गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नाही.

मानसिक तणाव जाणवत असल्यास मदतीसाठी संपर्क साधा : KIRAN हेल्पलाईन – 1800-599-0019

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...