अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा:
अंबाजोगाई बस स्थानक परिसरात भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ६० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील नवनाथ साळबा सोन्नर (वय: ६० ) हे दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकात जात होते. यावेळी बसस्थानकातील बस ( क्र. MH-14-MH-0566) च्या चालकाने हलगर्जीपणाने बस चालवून नवनाथ सोन्नर यांना धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी मुलगा राजेश नवनाथ सोननर (वय २८) यांनी फिर्याद दिल्याने दि. ०६/११/२०२६ रोजी गु.र.नं. ४९८/२०२६, कलम २८१, १२५(ए), १२५(बी) BNS अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.




