⚠️ कॉपीराईट सूचना

बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)

गौतम बचुटे/केज: बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवल्याने जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतातील सोयाबीन, कापूस, बाजरी अशी पिके करपून गेली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत दिवाळीसारखा मोठा सण साजरा करणे अनेक गोरगरीब कुटुंबांसाठी अशक्य बनले होते.

हीच सामाजिक जाणीव ठेवून केज येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे यांनी पुढाकार घेतला. ओरिजिनल कंपोझिट्स अँड फायबरग्लास कंपनी, केज आणि रमेश भिसे यांच्या जनविकास सामाजिक संस्थेच्या संयुक्त सहकार्याने तालुक्यातील अत्यंत गरजू 50 दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड करण्यात आली.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला किराणा किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, डाळ, चहा पावडर, फराळाचे साहित्य आणि लहान मुलांसाठी मिठाईचा समावेश होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हे किट थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवले, त्यामुळे गरजूंना कुठेही जावे लागले नाही.

घरात चूल पेटली

केज तालुक्यातील वडवळ, मस्साजोग, साळेगाव आणि केज शहरातील झोपडपट्टी भागातील भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला आणि दिव्यांग कुटुंबांना या मदतीचा लाभ देण्यात आला. अनेक कुटुंबांनी सांगितले की यावर्षी पीक नसल्याने दिवाळी साजरी करणारच नव्हतो, पण संस्थेमुळे घरात चूल पेटली आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आला.या सामाजिक कार्याबद्दल लाभार्थी कुटुंबांनी जनविकास सामाजिक संस्थेचे सचिव रमेश भिसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. दुष्काळाच्या काळात अशी मदत खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...