⚠️ कॉपीराईट सूचना

बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)

विश्वजीत गंडले/ घाटनांदुर:
सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद वृद्धांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड यांच्या लोकप्रिय परळी बुलेटिनच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 13 नोव्हेंबर) दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील गुरुदास सेवा आश्रमात करण्यात आले.

नेहमीप्रमाणे मोठ्या हॉटेल किंवा सभागृहात न करता यावेळी हे प्रकाशन वयो वृद्ध आश्रमातील आजी-आजोबांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने या सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. आश्रमाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक अजयकुमार गंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत प्रसिद्ध नाट्यकर्मी सिद्धार्थ तायडे, नरहरी मंठेकर, विलास ताटे, नागनाथ बडे वालेकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पत्रकार आणि आश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते परळी बुलेटिनचा ‘जगभरातील विद्यार्थी रस्त्यावर’ या विषयावरील विशेष दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणारे लेख, कविता आणि विशेष बातम्यांचा समावेश असल्याची माहिती संपादक रानबा गायकवाड यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना अजयकुमार गंडले म्हणाले की, परळी बुलेटिनने नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न मांडले आहेत आणि दिवाळी अंकाच्या निमित्ताने वृद्धाश्रमात येऊन वृद्धांसोबत सण साजरा करणे हे खऱ्या अर्थाने दिवाळीचा संदेश देणारे आहे. कार्यक्रमानंतर सर्व वृद्धांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळ वाटप करण्यात आले.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...