⚠️ कॉपीराईट सूचना

बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)

अंबाजोगाई – येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू रोडे यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे परळी येथील असलेले विष्णू रोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरातच स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांची ओळख अंबाजोगाईकर म्हणूनच जास्त होती. काल सायंकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.विष्णू रोडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावली होती. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

सेवानिवृत्तीनंतरही ते अंबाजोगाईतील सामाजिक उपक्रमात सक्रिय होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच माजी पोलीस सहकारी, मित्र परिवार आणि नागरिकांनी त्यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...