बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)
ङि सदानंद/अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरात दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराचे नियोजन कोलमडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. हा बाजार थेट मुख्य रस्त्यावर भरत असल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सुरुवातीला हा आठवडी बाजार परळी वेस परिसरातील साठे चौकात भरत होता. मात्र दिवसेंदिवस बाजाराची व्याप्ती आणि विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे हा बाजार आता खोलेश्वर माध्यमिक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्थलांतरित झाला आहे. भाजीपाला, फळे आणि इतर साहित्य विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसत असल्याने रस्त्याची रुंदी निम्म्यावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका खोलेश्वर शाळेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर शेकडो विद्यार्थी एकाच वेळी रस्त्यावर येतात. त्याच वेळी बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक, दुचाकी, ऑटो रिक्षा आणि चारचाकी वाहनांची गर्दी यामुळे या रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा उरत नाही. या आठवडी बाजारासाठी शहराबाहेरील एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा नियोजित भाजी मार्केटमध्ये कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि पालक वर्गातून होत आहे.
वाहनांना अडचण

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रस्त्यावरच भाजीपाला विक्री सुरू असल्याने वाहने एकमेकांना ओव्हरटेक करू शकत नाहीत. सतत हॉर्नचा आवाज आणि वादावादीचे प्रकार घडत आहेत. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी भावना व्यक्त होत आहे.
पर्यायी जागेची मागणी
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने या आठवडी बाजारासाठी शहराबाहेरील एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा नियोजित भाजी मार्केटमध्ये कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि पालक वर्गातून होत आहे.
